
Screenshot

न्यूज मराठवाडा प्रतिनिधी | संदीप लोखंडे
छत्रपती संभाजीनगर | (09 जून) : छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर भागातील एक युवक आणि त्याच्या मित्रमंडळींना जय श्रीरामचा नारा दिल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहेत.
तक्रारदार ऋषीकेश मच्छिंद्र खेडेकर (वय २१ वर्षे, रा. अयोध्या नगर, बजाजनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ८ जून रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास ते आणि त्यांचे मित्र यशवंत लंजे, प्रीतम जाधव आणि मोनिका टेंभुर्णे हे हायटेक कॉलेजसमोरील मैदानावर भरलेल्या मेळ्यात फिरण्यासाठी गेले होते.
मेळ्यातील राहटपाळण्यात बसले असताना काही अनोळखी व्यक्तींनी पाळणा वेगात फिरवण्यास सांगितले. पाळणा अधिक वेगाने फिरत असल्यामुळे भीतीने त्यांनी तो थांबवण्यासाठी सूचना दिली. खाली उतरताना त्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिली असता, उपस्थित असलेल्या दोन ते तीन अनोळखी मुस्लिम युवकांनी त्यांना अडवून आक्षेप घेतला आणि जाब विचारण्यास सुरुवात केली.
संवादातून सुरू झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आरोपींपैकी एकाने लोखंडी कड्याने ऋषिकेश खेडेकर यांच्या डाव्या डोळ्याजवळ मारहाण केली, ज्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली. त्यांचे मित्र आणि मैत्रिणी भांडण सोडवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच “या मेळ्यातून निघून जा, नाहीतर तुम्हाला पळवून मारू” अशी धमकी देत आरोपी पळून गेले.
या घटनेवरून वाळूज पोलिस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे करत आहेत.
आरोपी अद्याप अटकेबाहेर असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.
***
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न