July 7, 2025
patni pidit purush

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा – ( संदीप लोखंडे ) 

छत्रपती संभाजीनागर :  गृहकलह, खोट्या तक्रारी आणि मानसिक त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांसाठी कार्यरत असलेल्या ‘पत्नीपीडित पुरुष आश्रम’ यांच्या वतीने उद्या (९ जून) करोडी येथे पिंपळ पूजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पूजनाद्वारे पत्नीपीडित पुरुष आपल्या व्यथा देवासमोर मांडणार असून, “देवच आता न्याय देईल” या भावनेतून हा कार्यक्रम पार पडणार आहे. पत्नीपीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे यांनी सांगितले, “पुरुषांचं दुःख कुणी ऐकत नाही. अनेक पुरुष खोट्या कौटुंबिक कायद्यांत अडकतात. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि आत्मबल वाढवण्यासाठी आम्ही हे पिंपळ पूजन करतो आहोत.” हा कार्यक्रम एकप्रकारे शांत आणि प्रतीकात्मक आंदोलन ठरणार असून, पुरुषांनी भावनिक आक्रोश व्यक्त करत “मन की बात देवासमोर” ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, अनेकांनी या पूजनाचे समर्थन करत समाजात पुरुषांच्याही भावनांचा विचार व्हावा, अशी भूमिका घेतली आहे. न्यायासाठी अध्यात्माचा आधार घेतलेला हा उपक्रम राज्यभरातील पत्नीपीडितांसाठी प्रेरणा ठरू शकतो, अशी भावना आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!