July 7, 2025
Screenshot 2025-06-07 205227

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) 

वाळूज महानगर ; (७ जून) : वाळूज महानगरातील विविध भागांमध्ये बिनपरवाना आणि नियमबाह्य कॅफेंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कॅफेंमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांमुळे विशेषतः महिला व मुलींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतत्प झाले आहे. या कॅफेंच्या आसपास दिवसातून कोणत्याही वेळेस तरुणांचे टोळके अड्डा जमवून बसत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी अर्वाच्य भाषा, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तसेच संशयास्पद हालचाली यामुळे महिलांना व मुलींना सुरक्षितपणे प्रवास करणे अवघड झाले आहे. “शाळा आणि महाविद्यालयीन मुलींना सकाळी व संध्याकाळी या कॅफेंच्या आसपासून जाताना त्रास सहन करावा लागतो. काही वेळा छेडछाडही होते, पण पोलीस तक्रार केली तरी ती फारशी गंभीरपणे घेतली जात नाही,” असे स्थानिक महिलांनी सांगितले आहे. स्थानिक प्रशासनाने दाखल घेऊन तत्काळ कारवाई करावी अशी मागणी वाळूज परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.  काही कॅफे बेकायदेशीररीत्या उघडले गेले असून त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नाही. 

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा:

“जर लवकरच योग्य ती कारवाई झाली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा काही स्थानिक महिला व नागरिकांनी दिला आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!