July 7, 2025
IMG_8536

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
छत्रपती संभाजीनगर : शहरासह वाळूज एमआयडीसी व 17 गावांमधील लाखो लिटर सांडपाणी आणि केमिकलयुक्त पाणी थेट खामनदीत सोडले जात आहे. ही खामनदी गोदावरी नदीत मिळते, आणि त्यावरच जायकवाडी धरण आहे, ज्या धरणातूनच शहराला व औद्योगिक परिसरांना पाणी पुरवले जाते. यामुळे नागरिकांना परत तेच दूषित पाणी पिण्यासाठी मिळत आहे. प्रशासनाकडून अद्यापही सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकरी व नागरीकांमध्ये तीव्र संताप असून, तातडीने खामनदीवर किमान दोन शुद्धीकरण केंद्रांची मागणी केली जात आहे. सांडपाणी आणि केमिकलमुळे अनेक गावांमध्ये दुर्गंधी, त्वचा रोग, दमा व पोटाचे विकार वाढले आहेत. डॉ. पंकज बलदोटा यांच्या मते, वाळूज परिसरातील बहुतांश रुग्ण हेच त्रास घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. शहराच्या स्मार्ट सिटी योजनेत कोट्यवधी खर्च करूनही खामनदीची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

ooooo


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!