July 7, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज – येथे मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद-उल – अजहा ( बकरी ईद ) शनिवार दि ७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मुख्य इदगाह येथे कारी मोहम्मद यासिर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज अदा करुन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी शेकडोच्या संख्येने धर्म बांधवांची उपस्थिती होती. येथे बकरी ईद निमित्त लहान ,थोर , वृद्धांनी रंगीबेरंगी नवनवीन पोशाख परिधान करून सकाळी साडेसात वाजता जामा मस्जिद परिसरात एकत्र जमा झाले होते. तिथून एकत्रपणे मिरवणुकीने झेंडा मैदान मार्ग मुख्य वेशी तून येत महामार्गावर आले तेथून येथील हजरत सय्यद सादात बाबा दर्गा जवळ असलेल्या मुख्य ईदगाह मैदान येथे सकाळी ८ वाजता कारी मोहम्मद यासिर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सामूहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी जमाते अमीर हाजी इब्राहिम खान पठाण यांनी बकरी ईद कुर्बानी संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी मुतवली इर्शाद इनामदार यांनी सलाद दिली. कारी मोहम्मद यासिर यांनी यावेळी खुदबा पठण करून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विश्वशांती नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यानंतर सर्व बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल खान पठाण, अमजद खान , नदीम झुंबरवाला, माजी उपसरपंच खालिद पठाण, माझी ग्रामपंचायत सदस्य अन्सार खान पठाण, अफरोज कुरेशी, फिरोज कुरेशी, हाफिज नावेद खान,युसुफ पठाण ,शेख वली मिया, हाजी अहमद पटेल, शेख तय्यब , हाजी चांद पटेल, अनिस जेसिपी, तौफिक पटेल, साजीद पठाण यांच्या सह शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. नारायणपूर येथे सकाळी साडेआठ वाजता हाफिज दिलशाद यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज करण्यात आली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली .यावेळी सरपंच नासेर पटेल, उपसरपंच मजीद पटेल यांच्या सह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे, पोलीस अमलदार दत्तात्रेय गडेकर, अमोल गायकवाड ,पांडुरंग शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!