Screenshot

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : बजाजनगरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या पाटील लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन परराज्यातील महिलांची सुटका करून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा छापा दि 5 जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान टाकण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजाजनगरातील प्रताप चौकात असलेल्या गरुडा पाटील यांचे पाटील लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होतो. मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून छापा टाकण्यात आला. छापा टाकल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये लॉज मधील मॅनेजर गणेश भीमराव भारती हा ग्राहकाकडून १५०० रु घेत होता व पीडित महिलेला ५०० रु देऊन हा व्यवसाय करत होता.

पोलिसांनी हॉटेलमध्ये पाहणी करतांना ५ ग्राहक आरोपीला ताब्यात घेतले आहे. मनोहर प्रकाश नाईक रा. मोहाडी ता. पाचोरा जि. जळगाव, शाहीराम राघो सोळुंके वय २८ रा. चिमनापुर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर, कुंदन सखाराम जाधव वय २४ रा. करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर, सुनिल भानुदास टकले वय २८ रा. रोहिलागड पाचोड ता. अंबड जि. जालना, साईनाथ राजकुमार अर्जुने वय १९ रा. कोरेवाडी पोस्ट ओलांडी ता. देवणी जि. लातुर असे ताब्यात घेतलेल्या पाच ग्राहकांचे नावे आहेत. पुढील तपास पोलिस करत आहे.

-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 7 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 13 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


