July 8, 2025
IMG_8432

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध कत्तलीसाठी अंबेलोहळ गावात लपवून ठेवलेल्या १७ गोवंशांची वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई ५ जून रोजी सायंकाळी गोरक्षक दलाच्या माहितीवरून करण्यात आली. गोवंशांची एकूण किंमत ३ लाख ५४ हजार रुपये इतकी आहे.

जनावरे गोशाळेत हलवले
ही कारवाई दोन ठिकाणी करण्यात आली. पहिल्या ठिकाणी अंबेलोहळ – तुर्काबाद रस्त्यावरील एका वाड्यावर छापा टाकला असता, ताडपत्रीच्या आड लपवलेली सात गोवंश आढळली. या जनावरांना ताब्यात घेऊन दतप्रभू गोशाळा, रांजणगाव येथे हलवण्यात आले. यावेळी अस्लम नबी शेख (४०) व हरुण करीम शेख (६०) यांच्यावर गुन्हा दाखल आला आहे.


दुसऱ्या छाप्यात दहा गोवंशांची सुटका
दुसऱ्या ठिकाणी शहाजी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोठा येथे पोलिसांनी छापा टाकला असता, दहा गोवंश आढळले. ही कारवाईही यशस्वी ठरली असून पोलिसांकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गोरक्षकांच्या तीन दिवसांच्या पाळतीनंतर कारवाई
अमित कुमार सिंह, सूरज जाधव पाटील, गौरव क्षिरसागर पाटील, आदित्य बोडखे पाटील, नैयना राजपूत, मनोज बिडकर आदी गोरक्षक कार्यकर्त्यांनी तीन दिवस अंबेलोहळ गावात सतत पाळत ठेवली. याआधी त्यांनी लासूर स्टेशनचा जनावरांचा बाजार बंद केला होता. अखेर त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही कारवाई राबवण्यात आली.


गायीच्या अंगावर गंभीर जखमा; अमानुषतेचा प्रकार उघड
या कारवाईत एका गायीवर प्रचंड जखमा असल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीदरम्यान तिला वाहनात निर्दयपणे कोंबण्यात आले होते. पोटाच्या दोन्ही बाजूंनी खोल जखमा असल्याचे स्पष्ट दिसत होते.


शेतकरी असल्याची बतावणी
पोलिसांनी छापा टाकताच काही व्यापाऱ्यांनी आपल्याला शेतकरी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गायी व बैलांना कुरवाळत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. एका व्यापाऱ्याने कबूल केले की, “जर लासूरचा बाजार बंद केला नसता, तर एवढ्या गोवंशांची सुटका झाली नसती.”


गोरक्षकाला फोनवरून धमकी
गावातील एका स्थानीय राजकारणी व्यक्तीने गोरक्षकाला गाव सोडून जाण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे हा राजकारणी हिंदू असूनही, गोवंश सुटकेच्या कारवाईत अडथळा निर्माण करत असल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.


राजकीय द्वेषातून कारवाई माजी सरपंचाचा दावा
या कारवाईमुळे गावात राजकीय वातावरण तापले आहे. अंबेलोहळमधील एक व्यापारी सरपंचपदाचा दावेदार असून, त्याला बदनाम करण्यासाठी छापा नाट्य रचल्याचा आरोप माजी सरपंच संतोष जाधव यांनी केला आहे.


पोलीस व गोरक्षकांची संयुक्त मोहीम यशस्वी
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप पाटील, उपायुक्त नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक निरीक्षक अरविंद शिंदे, उपनिरीक्षक संदीप काळे, भाग्यश्री शिंदे तसेच रेखा चांदे, अंमलदार योगेश शेळके, बाळासाहेब आंधळे, अरुण उगले, जालिंधर रंधे, राहुल भंगाळे, गजानन कसबेवाड, , अंमलदार योगेश शेळके, शिवनारायण नागरे , मंगेश जाधव , सय्यद चांद , राम तांदळे , प्रशांत सोनवणे यांच्यासह गोरक्षक कार्यकर्त्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!