

वाळूज महानगर – वाळूज महानगरातील सिडको परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना उघडकीस आली असून, तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरात घुसून सुमारे पावणे दोन तोळ्यांचा मोहन माळ आणि चार हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना गट क्रमांक १४०, नायरा पेट्रोल पंपाच्या समोर राहणाऱ्या पुरुषोत्तम (अजय) साहेबराव तांबे यांच्या घरात घडली.
तांबे कुटुंबातील पुरुषोत्तम तांबे व पत्नी अनिता हे घराच्या खालच्या मजल्यावर झोपले होते, तर वरच्या मजल्यावर आई वडील खोलीत झोपलेले होते. वरच्या मजल्याच्या एका खोलीत ही चोरी झाली असून सकाळी अनिता तांबे वरच्या खोलीत गेल्यावर त्यांना सामान अस्ताव्यस्त दिसले. सुटकेस तपासून पाहिल्यावर त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे भगवान मगर, गजानन कसबेवाड, श्वान पथक यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, वाळूज परिसरात चोरी, दरोडे, घरफोडी, मारहाणीसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता व कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचे कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची नुकतीच बदली झाल्याने गुन्हेगारांवरील वचक काहीसा कमी झाल्याची चर्चा आहे.

वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याने मरगळ झटकून कडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे. या घटनेचा तपास सुरु असून, चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
अवैध देशी दारू दुकानामुळे गुन्हे परिसरात गुन्हेगारीत वाढ-
वडगाव तिसगाव रोडवरील नायरा पेट्रोल पंप समोर बऱ्याच दिवसापासून एका शेध्ये अवैध दारू विक्री चालते त्यामुळे परिसरात दारुडे रस्त्याच्या बाजूला उघड्यावर लघुशंका करणे, नागरिकांना शिवीगाळ करणे, परिसरातील महिलांना त्रास देणे, दादागिरी करणे यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. पोलिसांनी या दुकानावर कारवाई करून तत्काळ अवैध दारू दुकान बंद करण्याची मागणी परिसरस्तील महिलांनी केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
*****
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न