July 7, 2025
ef79918c-b136-4e76-ad92-d1f7f292e9f5

वाळूज सिडको महानगरातील ऑर्किड महाविद्यालयाने बारावीच्या यशस्वी निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली. विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाच्या प्राचार्या रेणुका काकडे यांनी स्वागत केले. यावेळी शेख अंजुम बानो, जीवींआर सर, सचींदर राय, सुप्रिया शेळके, निकिता मेहेर, मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका तसेस शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गुरव चैतन्य याने ९५.८३% गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळवला. त्यात त्याने संस्कृत व अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. धोत्रे रितेश याने ९३.१७% गुण प्राप्त करून दूसरा क्रमांक मिळवला, त्यात त्याने अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. निकम अजित याने ८९.६७% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला. यात त्याने अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. तसेच, दाभाडे लावण्या हिने ८७.१७%, पांडे मेहेक ८६.३३%, राठोड ओम ८६.१७%, बसवदे साईराज ८५.६७%, सिन्हा मोहितकुमार ८५.१७%, गायकवाड सागर ८४.८३%, विजयवर्गीय तनया ८४.०५%, खवले आदित्य ८३.६७% गुण प्राप्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, सौ. लता नंदमुरी, जयेश नंदमुरी यांची उपस्थिती होती. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ऑर्किड ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व भावी वाटचाली साठी शुभेछा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!