April 3, 2025
IMG_5335

न्यूज मराठवाडा वृत्तीवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगरातील येथील वाळूज परिसरातील ओॲसीस चौकात वाहतूक पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कारवाई करत असताना एका व्यक्तीने पोलिसांशी हुज्जत घालत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ओयासीस चौकात वाहतूक नियंत्रण करत होते. यावेळी MH 43 X 4093 क्रमांकाच्या इर्टिका कारचा चालक रस्त्यात वाहन अडवून प्रवाशांची सोय करत होता. पोलिसांनी त्याला गाडी काढण्यास सांगितले असता, संबंधित इसमाने आक्रमक होत पोलिसांशी वाद घातला. ई-चलन काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांचा कॉलर पकडून मारहाण केली. तसेच त्याच्या गाडीतील लाकडी दांडक्याने एकाला मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीस ताब्यात घेतले. हल्लेखोराचे नाव एजाज सय्यद मोहम्मद अली (वय 44, रा. सलामपुरेनगर, पंढरपूर) असे आहे. दरम्यान, गाडी चालक रोहित मधुकर दळवी (वय 21, रा. अंबुर्ती चौक, वडगाव को.) याचे देखील नाव समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपीवर शासकीय कर्मचाऱ्याला अडवणे, शारीरिक हानी करणे, वाहतूक नियम मोडणे आणि कायदा हातात घेणे यांसारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास MIDC वाळूज पोलीस करत आहेत.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!