April 3, 2025
76a70967-c91f-444e-bbdb-53fd967e89cd

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर: महाराष्ट्र ही संत-महंतांची भूमी आहे, जिथे विविध सण सामाजिक सलोख्याने साजरे होतात. मात्र, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांनी दिला.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. यंदाही नाथषष्ठी, रमजान ईद, गुढीपाडवा, श्रीराम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसारखे सण उत्साहात साजरे केले जाणार आहेत. या सणांमध्ये सर्व समूहांनी एकत्रित येऊन शांतता राखावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी केले.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, एपीआय मनोज शिंदे, एपीआय अरविंद शिंदे, पीएसआय सलीम शेख, भाग्यश्री शिंदे बाळासाहेब आंधळे राजाभाऊ कोल्हे योगेश शेळके, विक्रम वाघ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत तिसगावचे माजी उपसरपंच व उद्योगपती विष्णू जाधव पाटील, शहर प्रमुख विशाल खंडागळे, सरपंच लालचंद कसुरे, उद्योगपती अर्जुन आदमाने पाटील, भाजप नेते नरेंद्र यादव, ग्रामपंचायत सदस्य किरण गंगावणे, प्रकाश निकम, जाफर पटेल, तौफीक पटेल, अस्लम पटेल, अतुल दाभाडे पाटील, अनिता पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, इमाम- मौलाना, उद्योगपती, राजकीय, शैक्षणिक संस्थाचालक आदीसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
सायबर क्राइम अंतर्गत होणार कारवाई
सण-उत्सव साजरे करताना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे टाळावे, अन्यथा सायबर क्राइम अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील. सर्व धार्मिक सण एकोप्याने आणि सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!