July 8, 2025
ec9d58ef-223f-4748-bcd1-8fe4aae57d7d

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक परिसरामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बरेच कामगार हे आपल्या दुचाकीने ये-जा करतात. परंतु औद्योगिक क्षेत्रासह रहिवाशी भागामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून दिवसाआड दुचाकी चोरी होत असल्याची माहिती आहे. या चोरट्यांवर आवर घालण्याचे आवाहन नागरिकांने केले आहे.

दि ९ फेब्रुवारी रोजी रांजणगाव शे पू येथील देवगिरी नगर येथून गणेश काचरु गिरी यांची दुचाकी एम एच २० बी एस ३९४२ ही चोरट्यांनी लांबली असून दुचाकी चोरी करताना चोरटा कॅमेरात कैद झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!