July 8, 2025
471cccc8-c495-4f4b-8783-b255d430eeb0

छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगरची खासगी बस पर्यटक घेऊन गोव्याला गेली होती. परतताना कोल्हापूरजवळ ही बस उलटून एका पर्यटकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी झाले. ३० पर्यटक जखमी झाले आहेत. हे सर्व पर्यटक छ. संभाजीनगरचे आहेत. करवीर तालुक्यातील कांडगाव येथे रविवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्री ही घटना घडली. अमोल परशुराम भिसे (वय ४०, रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीतील १४३ कर्मचारी ३० जानेवारीला चार खासगी बसमधून गोव्याला गेले होते. रविवारी सायंकाळी साडेसातला ते गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले. रात्री आठच्या सुमारास कणकवलीमध्ये जेवण केले. तेथून फोंडा घाटमार्गे कोल्हापूरला येऊन तिथून छत्रपती संभाजीनगरला जाणार होते. खासगी बस (डीडी ०१ टी ९३३३) मध्यरात्री १२ च्या सुमारास कांडगाव येथे वळण घेताना उलटली. चार गंभीर जखमींना तात्काळ कोल्हापूरला सीपीआर आणि खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसमध्ये ३५ प्रवासी होते. ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!