August 31, 2026
IMG-20260831-WA0022

३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर: दुर्दैवी घटनेची आठवण अद्याप ताजी असतानाच, खवडा डोंगरावरील धोकादायक ठिकाणी एक व्यक्ती गेल्याचं ३० ऑगस्ट रोजी समोर आलं. खवडा डोंगरावरील ठिकाणी पुन्हा एक व्यक्ती गेल्याचं दिसलं.

चांदगुडे कुटुंबाच्या घटनेनंतरही खवडा डोंगरावर धोकादायक प्रकार सुरूच! तथापि नागरिकांनी तातडीने आवाज देऊन त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेण्याचं आवाहन केलं.

यापूर्वीच चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला होता. यासाठी अशा संवेदनशील ठिकाणी पर्यटकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

३० ऑगस्ट रोजी पुन्हा एक व्यक्ती धोकादायक ठिकाणी गेल्याचं दिसून आल्यानंतर खाली असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्याला आवाज दिला.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित व्यक्ती सुरक्षित ठिकाणी परतल्याने संभाव्य दुर्घटना टळली. धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

खवडा डोंगरावर अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना, सूचना फलक आणि आवश्यक प्रतिबंधात्मक व्यवस्था करण्याची मागणीही होत आहे. एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवू शकते. पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वतःच्या आणि सोबत असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!