
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर
मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन दोन दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना बजाजनगरात घडली.
१८ जुलै रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मोहटा देवी मंदिर ते हायटेक कॉलेज मार्गावरील महादेव मंदिराजवळ ही घटना घडली. स्पीडब्रेकरमुळे महिलेने स्कुटीचा वेग कमी करताच मागून आलेल्या दुचाकीवरील व्यक्तीने तिच्या गळ्यातील २३.९४० ग्रॅम वजनाची ‘S’ अक्षराचे लॉकेट असलेली सोन्याची चैन हिसकावली.
महिलेने आरडाओरड केली, मात्र चोरटे हायटेक कॉलेजसमोरून राजे शिवाजी स्कूलच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. दोन्ही संशयितांचे वय अंदाजे २५ ते २६ वर्षे असून मागे बसलेल्या व्यक्तीने हुडी व मास्क घातला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
-
बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपास

Share Total Views: 2 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन

Share Total Views: 18 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला

Share Total Views: 1,080 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
