
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर
तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुणाल मुरलीधर चांदवडे (वय 18),मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा सगळा प्रकार सुरु झाला होता. कुणाल चांदवडे हा नैराश्याच्या भरात खवड्या डोंगरावर जीव द्यायला गेला होता. त्याच्यापाठोपाठ त्याचे आई-वडील, तिसगावचे ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. सकाळी दहा वाजल्यापासून कुणालचे आई-वडील आणि तिसगावचे ग्रामस्थ त्याची मनधरणी करत होते. मात्र, दुपारी एकच्या सुमारास कुणालने अखेर डोंगरावरुन खाली उडी टाकली आणि त्याला वाचवताना तोल जाऊन वडीलही खाली पडले. त्यापाठोपाठ आईनेही डोंगरावरुन खाली उडी टाकली. उंचावरुन खाली पडल्यामुळे या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.
तिसगावच्या सरपंचांनी याबाबत बोलताना सांगितले की, तो वारंवार जागा बदलत होता. मात्र, आईशी बोलत होता. दुपारी एक वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. आम्ही कुणालला अनेकदा विनवणी केली. पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे वडील आधी डोंगराच्या खाली होते. आई वर उभी राहून त्याची समजूत काढत होती. शेवटच्या 15 ते 20 मिनिटांत वडील वर आले. आम्हाला वाटलं ते त्याला बोलण्यात गुंतवतील. मात्र, ते मुलाला धरायला गेले आणि दोघेही खाली पडले. त्यांच्यापाठोपाठ आईनेही खाली उडी मारली, असे तिसगावच्या सरपंचांनी सांगितले.
-
मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू

Share Total Views: 2 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
-
बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपास

Share Total Views: 7 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन

Share Total Views: 23 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
