फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपरफुटीशी संबंधित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती देत, परीक्षांमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राखणे ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले. पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, तसेच दोषींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी विशेष न्यायालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे प्रकरणांचा जलद निपटारा होऊन परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
हा स्वातंत्र भारत आहे, मोगलाई नाही!’; गणेशोत्सवाच्या परवानगीवरून सचिन गरड आक्रमक

Share Total Views: 18 शांतता समितीच्या बैठकीत खड्डे, पार्किंग, विसर्जन मार्ग, बेवारस वाहने, दुचाकी बंदी
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”

Share Total Views: 26 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!

Share Total Views: 400 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
