
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके)
छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील प्रती पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानात अत्यंत भक्तिमय वातावरणात महाभिषेक, महापूजा आणि विशेष पूजेचा सोहळा उत्साहात पार पडला. या वर्षीच्या महापूजेचा मान महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना लाभला.
मध्यरात्री बारा वाजता विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीवर वैदिक मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विठूमाऊलीची विधिवत पूजा करून राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि शांतता लाभावी, शेतकरी समृद्ध राहावेत तसेच कष्टकऱ्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी अर्पण केली.

यावेळी खासदार संदीपान भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही महापूजा व महाआरतीत सहभाग घेतला. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, मंदिराचे पदाधिकारी, मान्यवर, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापूजा आणि आरतीनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” अशा नामघोषांनी दुमदुमून गेला होता.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे प्रती पंढरपूर परिसराला भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचे अनोखे स्वरूप लाभले. हजारो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.
-
हा स्वातंत्र भारत आहे, मोगलाई नाही!’; गणेशोत्सवाच्या परवानगीवरून सचिन गरड आक्रमक

Share Total Views: 18 शांतता समितीच्या बैठकीत खड्डे, पार्किंग, विसर्जन मार्ग, बेवारस वाहने, दुचाकी बंदी
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”

Share Total Views: 26 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!

Share Total Views: 400 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
