
न्युज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
सोशल मीडियावर हातात तलवार घेऊन रील तयार करून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने कारवाई करत जेरबंद केले. आरोपीकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आनंद गणेश मानकर (वय 23) असे असून तो अयोध्यानगर, वडगाव कोल्हाटी, विशाल महेर यांच्या घरी भाड्याने राहणारा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता वडगाव कोल्हाटी परिसरात एक तरुण हातात तलवार घेऊन रील तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी रीलमधील तरुणाचा शोध घेतला. शोधमोहीमेदरम्यान आरोपी तलवारीसह मिळून आल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील तलवार जप्त करून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने हातात तलवार घेऊन सोशल मीडियावर रील तयार करून प्रसारित केली होती. या कृत्यामुळे समाजात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिसांनी त्वरित कारवाई केली.
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलीस हवालदार अरुण उगले, बाबासाहेब काकडे, अमोल मनोरे, पोलीस अंमलदार राजू वाघ, सुरज अग्रवाल, नितीन इनामे, समाधान पाटील, रोहित चिंघाळे, प्रकाश वाघ, वैभव गायकवाड, हनुमान ठोके, संदीप तागड आणि महिला पोलीस अंमलदार छाया दहिजे यांनी पार पाडली.
सामाजिक माध्यमांवर शस्त्रांचे प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळविणे, समाजात दहशत निर्माण करणे किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दिला आहे.
-
तलवारीचा धाक दाखवत सोशल मीडियावर रील करणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी वाळूज पोलिसांची धडक कारवाई

Share Total Views: 2 न्युज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी सोशल मीडियावर हातात
-
साजापूर येथील गोडाऊन चोरीचा अवघ्या काही दिवसांत छडा; एममायडीसी वाळूज पोलिसांची मोठी कारवाई

Share Total Views: 2,567 ₹2.88 लाख किमतीच्या 144 इंडक्शन शेगड्या जप्त; एक आरोपी अटकेत न्यूज
-
पिंपळास साकडे; पत्नी पीडित पुरुषांचा न्यायासाठी अनोखा सामाजिक उपक्रम

Share Total Views: 3,876 न्युज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर (अनिकेत घोडके) वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर
