₹2.88 लाख किमतीच्या 144 इंडक्शन शेगड्या जप्त; एक आरोपी अटकेत

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने साजापूर शिवारातील एका गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या ₹2 लाख 88 हजार किमतीच्या 144 इंडक्शन शेगड्या जप्त करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी इनायत सिराज पठाण (वय 25, रा. हनुमान मंदिराजवळ, साजापूर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी नजीर खान कदीर खान (वय 45, व्यवसाय – व्यापारी, रा. गट क्र. 51, प्लॉट क्र. 238, साजापूर शिवार, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
फिर्यादीनुसार, 15 जून 2026 रोजी त्यांनी साजापूर येथील गोडाऊनला कुलूप लावून ते इतर कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर 30 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता ते गोडाऊनमध्ये गेले असता, इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेल्या खोलीचा दरवाजा तुटलेला आढळला. आत पाहणी केली असता प्रत्येकी ₹2,000 किमतीच्या 144 इंडक्शन शेगड्या, एकूण किंमत ₹2 लाख 88 हजार, चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपी इनायत सिराज पठाण याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या 144 इंडक्शन शेगड्या, एकूण किंमत ₹2 लाख 88 हजार, जप्त करण्यात आल्या.
या प्रभावी कारवाईमुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक संजय जगताप तसेच अरुण उगले, बाबासाहेब काकडे, अमोल मनोरे, राजू वाघ, सूरज अग्रवाल, नितीन इनामे, समाधान पाटील, रोहित चिधाळे, प्रकाश वाघ, वैभव गायकवाड, हनुमान ठोके, संदीप तागड आणि महिला पोलीस अंमलदार छाया दहिजे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन

Share Total Views: 18 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला

Share Total Views: 1,080 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न

Share Total Views: 27 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
