
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथे पैशांच्या वादातून एका तरुणावर बेल्ट व लोखंडी वस्तूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी टिंगु ललन यादव (वय 32, रा. हनुमाननगर, रांजणगाव, ता. गंगापूर) हे आपल्या रूम पार्टनरकडून भाड्याचे व उसने दिलेले पैसे घेण्यासाठी 26 मार्च रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिरासमोर गेले होते.
यावेळी आरोपी गणेश बाबासाहेब खेडकर (रा. हनुमाननगर, रांजणगाव) याने पैसे नसल्याचे सांगत संतापाच्या भरात फिर्यादीला कमरेच्या चामडी बेल्टने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत त्याच्या मित्रानेही हाताने मारहाण केली.
इतक्यावरच न थांबता, आरोपी गणेश खेडकर याने हातातील लोखंडी वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे छोट्या पैशांच्या वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन

Share Total Views: 18 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला

Share Total Views: 1,080 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न

Share Total Views: 27 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
