
न्युज मराठावाडा वृत्तसेवा :
सिल्लोड: तालुक्यातील पळशी येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन करण्यात आले. शिवस्मारक समिती, जय श्रीराम मित्र मंडळ, शिवस्वराज्य ग्रुप तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पुतळ्याचे स्थानपन्न करण्यात आले.
या सोहळ्यासाठी ग्रामस्थांकडून आठवडाभरापासून जोरदार तयारी करण्यात आली होती. पुतळा स्मारक व परिसर विद्युतरोषणाई व फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. गावातील गल्लीबोळ रांगोळ्यांनी नटले होते, तर घरोघरी गुढी उभारून उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर येथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून पुतळ्याची मिरवणूक पळशीकडे रवाना झाली. महामार्गावर ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याचे स्वागत करण्यात आले. केऱ्हाळा फाट्यापासून पळशीपर्यंत तब्बल तीन तास मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर मार्गावर उभारलेले भगवे झेंडे आकर्षण ठरत होते.
मिरवणुकीत पुरुष, तरुण, महिला व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भगव्या टोप्या आणि जल्लोषात आतिषबाजी
मिरवणुकीत तरुणांच्या भगव्या टोप्या आणि पारंपरिक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले. पुतळ्याचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ‘प्रभू रामचंद्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले. तसेच रामनवमी निमित्त प्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन

Share Total Views: 18 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला

Share Total Views: 1,080 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न

Share Total Views: 27 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
