
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी, बजाजनगर येथील आरोग्य उपकेंद्रात स्वच्छतेचा गंभीर अभाव असल्याचे समोर आले आहे. हे उपकेंद्र दौलताबाद आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असून, जिल्हा परिषद सदस्य सचिन गरड यांनी अचानक भेट देत पाहणी केली.

पाहणीदरम्यान उपकेंद्रामध्ये सर्वत्र धूळ साचलेली, ठिकठिकाणी कचरा पडलेला तसेच परिसरात झाडे-झुडपे वाढलेली असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
यावेळी सचिन गरड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धनोरकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तसेच आरोग्य केंद्र आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक नागरिकांकडूनही आरोग्य केंद्रातील स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन

Share Total Views: 18 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला

Share Total Views: 1,080 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न

Share Total Views: 27 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
