अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभाग यांची कारवाई

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर | राज्यात वाढत्या अवैध ड्रग्स तस्करीवर आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई करत नशेच्या औषधांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ₹9,39,827 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या टास्क फोर्सने ही कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, बीड, जालना आणि धाराशिव या परिसरासाठी स्वतंत्र कृती विभाग कार्यरत आहे.
21 मार्च 2026 रोजी छावणी पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलम 8(C), 21, 22(C) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 207, 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
जप्त मुद्देमाल:
Nitrazepam Tablet I.P 10 mg (AADPAM-10) – 2000 गोळ्या
Kaimodin-T कफ सिरप (Codeine Phosphate & Triprolidine Hydrochloride) – 100 ml च्या 118 बाटल्या
हा साठा आरोपी सय्यद अझर सय्यद अकबर (रा. चांदमारी, छावणी) याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, टास्क फोर्सचे पथक कारवाईसाठी पोहोचताच आरोपी मुद्देमाल जागीच सोडून फरार झाला होता.
23 मार्च 2026 रोजी पोलिसांनी आरोपीला छावणी परिसरातून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन:
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव परिसरात कोणीही अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, वाहतूक किंवा लागवड करत असल्याची माहिती असल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अंमली पदार्थांविरोधात प्रशासनाचा कडक इशारा – अशा बेकायदेशीर कृत्यांवर आता कोणतीही तडजोड नाही.
-
लाडक्या पत्नीचाच रौद्रावतार! फोन कॉलच्या वादातून नवऱ्यावर चाकू हल्ला

Share Total Views: 11 छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर
-
ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यश

Share Total Views: 28 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) बजाजनगर,
-
ESIC रुग्णाकडून अवैध पैसे उकळल्याचा आरोप; हॉस्पिटलने आरोप फेटाळले…

Share Total Views: 72 छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज
