
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील उपळी परिसरात बुधवारी (ता. १८) सायंकाळी अचानक हवामानात मोठा बदल झाला. काळेभोर ढग, विजांचा कडकडाट आणि टपोऱ्या पावसाच्या थेंबांनी वातावरण ढवळून निघाले. वादळी पावसाची शक्यता निर्माण होताच शेतकऱ्यांची शेताकडे धावपळ सुरू झाली.

रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही पिके सध्या काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत दिसून आले. काही ठिकाणी हार्वेस्टरच्या सहाय्याने गहू काढणी वेगाने सुरू करण्यात आली, तर दुसरीकडे आधीच काढून ठेवलेला गहू पावसापासून वाचवण्यासाठी शेतकरी ताडपत्रीने झाकण्याचा आटापिटा करत होते.
अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
