
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत अपेक्षित असलेले भाजप-शिवसेना सत्तावाटप अखेर कोलमडले. दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असतानाही ऐनवेळी भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे करून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर दावा केल्याने शिवसेना (शिंदे गट) संतप्त झाली. या घडामोडींमुळे युतीत तणाव निर्माण झाला असून शिवसेनेने निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.
सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष आग्रही होते. दुपारपर्यंत युतीचाच अध्यक्ष-उपाध्यक्ष होईल, असे दोन्ही बाजूंनी सांगितले जात होते. मात्र, भाजपाने इतर पक्षांच्या सदस्यांचे समर्थन मिळवत अचानक दोन्ही पदांसाठी स्वतःचे उमेदवार अर्ज दाखल केले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या ग्रँड सरोवर हॉटेलमध्ये शिवसेना सदस्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीस माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार विलास भुमरे, निरीक्षक विलास पारकर, जिल्हाप्रमुख रमेश पवार, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते राधाकृष्ण पठाडे, अनुराग शिंदे आदी उपस्थित होते. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजपावर ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, पक्षफुट टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या २१ जिल्हा परिषद सदस्यांसह काही अपक्ष सदस्यांना एकत्र ठेवत खबरदारी घेतली होती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी सर्व सदस्यांचा मुक्काम ग्रँड सरोवर हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता.
युती टिकवण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. मात्र अध्यक्षपदाच्या पहिल्या टर्मवरून तिढा सुटला नाही.
भाजपाच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकत आगामी सभापती निवडणुकीत भाजपाला ‘धडा शिकवणार’ असा इशारा दिला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना देऊन पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 1 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,262 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 10 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
