घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत; तासन्तास रांगा, नागरिक त्रस्त

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा: अनिकेत घोडके
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना सिलेंडरसाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे.

गॅस एजन्सींमध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. अनेकांनी ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी दोन-तीन दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. घरगुती वापरासाठी गॅस उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, संबंधित गॅस एजन्सींकडून पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे सांगण्यात येत असले तरी नागरिकांना प्रत्यक्षात दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 9 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
-
Share Total Views: 8 बजाजनगरातील जिवघेणा हल्यातील तीन आरोपी पोलसांकडून अटक; फायरिंगचाही झाला होता प्रयत्न
