
न्युज मराठवाडा वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील वडगाव कोल्हाटी गावातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे. गावातील गट क्रमांक ५ ते १३ मधील कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनींच्या सातबारा नोंदणी व फेरफार प्रक्रिया आता मोफत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असून यासाठी लवकरच गावात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी (SDO) आणि अपर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत तलाठी अधिकारी श्री. जठार आणि श्री. साबळे यांनी नागरिकांना स्पष्ट आश्वासन दिले की, प्रशासनाच्या वतीने गावात विशेष शिबिर (Special Camp) आयोजित करून नागरिकांच्या घरांचे व प्लॉटचे तपशील थेट सातबारा उताऱ्यावर नोंदवले जातील.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक सातबारा नोंदीसाठी प्रतीक्षेत होते. मात्र, काही मध्यस्थांकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेत गरिबांकडून ६ ते ८ हजार रुपयांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आणि प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राजेश साळे (मा. पंचायत समिती सदस्य) आणि योगेश साळे (उपविभाग प्रमुख, शिवसेना) यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेत आता कोणत्याही मध्यस्थाशिवाय सरकारी नियमांनुसार मोफत सातबारा नोंदणी प्रक्रिया करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे वडगाव कोल्हाटी येथील हजारो कष्टकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
