परदेशीपुरा भागात पोलिसांची धाड; ६५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा: गोकुळ लाडे
गंगापूर : गंगापूर शहरातील परदेशीपुरा भागातील बाभळीच्या झाडाझुडपात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सहा गोवंश जनावरांची गंगापूर पोलिसांनी सुटका करून त्यांना जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि.१०) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत परदेशीपुरा भागातील बाभळीच्या झाडांमध्ये काही गोवंश जनावरे कत्तलीसाठी चारा-पाण्याविना बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी जर्सी व गावरान जातीच्या सहा गोवंश जनावरांना अत्यंत क्रूरतेने चारा-पाण्याविना बांधून ठेवलेले आढळले. या जनावरांची एकूण किंमत सुमारे ६५ हजार रुपये असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भागवत खाडे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ), ५(ब) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(d) व ११(१)(h) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास बीट अंमलदार गणेश जाधव करीत आहेत.
दरम्यान, भरवस्तीत अशा प्रकारे कत्तलीसाठी जनावरे आणून ठेवण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


