
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:
वाळूज महानगर: केंद्र सरकारने प्रोपेन-ब्युटेन वायू केवळ घरगुती एलपीजीसाठी राखीव ठेवल्याने औद्योगिक क्षेत्रासाठी एलपीजी गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे वाळुज, शेंद्रा व चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ) तर्फे BPCL अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली.
ही बैठक मसिआ कार्यालय, वाळुज येथे पार पडली. बैठकीस मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड व उपाध्यक्ष राहुल मोगले उपस्थित होते. तर BPCL तर्फे पुनीत गुप्ता, साळुंके आणि टेरिटरी मॅनेजर मनोज कुमार जाधव यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.
यावेळी उद्योगांना भेडसावत असलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. अनेक उद्योगांमध्ये उत्पादनासाठी एलपीजी हा महत्त्वाचा इंधन स्रोत असल्याने पुरवठा बंद झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याची माहिती उद्योजकांनी दिली.
BPCL अधिकाऱ्यांनी गॅस जोडणी, करार प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांबाबत माहिती देत उद्योगांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही उद्योगांनी BPCL सोबत करार करण्यास सहमती दर्शवली असून लवकरच गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मसिआ पदाधिकारी व विविध उद्योगांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
