Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर
वाळूज महानगर पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगची घटना घडली असून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9.45 वाजता ए.एस. क्लबजवळील भारत पेट्रोल पंपासमोर घडली.
याबाबत राहुल आबासाहेब मैद (रा. शहापूर, ता. अंबड, जि. जालना) यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, राहुल मैद हे पत्नीसमवेत मेव्हण्याच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी गिफ्ट खरेदी करून रांजणगावकडे दुचाकीवरून जात असताना लाल रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळे वजनाचे सुमारे 79 हजार 920 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे दुचाकीचा तोल जाऊन दोघेही रस्त्यावर पडले. यामध्ये महिला जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
____________
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


