Screenshot

सिल्लोड (प्रतिनिधी ):
सिल्लोड–कन्नड रोडवरील वाडी फाटा परिसरात उभ्या असलेल्या बसला मोटारसायकलची जोरदार धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि. 9) रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
राजेंद्र दलपत मोरे (वय 35, रा. तळणेर, ता. कन्नड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोडहून आमठाणा येथे जाणारी बस (क्र. MH 20 BL 1666) वाडी फाटा येथे काही प्रवाशांना उतरवण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी सिल्लोडकडून मोटारसायकल (क्र. MH 20 G 8834) वरून येत असलेल्या राजेंद्र मोरे यांनी बसच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या मागील बाजूचा पत्राही वाकला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जखमी राजेंद्र मोरे यांना सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
राजेंद्र मोरे हे सिल्लोडहून आपल्या तळणेर गावाकडे मोटारसायकलने जात असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे करत आहेत.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


