Screenshot

वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) : बजाजनगर परिसरात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवस्मारक येथे भव्य शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त व नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
मात्र या उत्सवाला काही हुल्लडबाज तरुणांनी गालबोट लावल्याची घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी नागरिकांमध्ये घुसून ढकलाढकली व आरडाओरडा, वाहनांना साहित्य ओढाओढ करत हुल्लडबाजी केली. त्यामुळे महिला व लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित तरुणांचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
उत्सवाचा आनंद शांततेत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रत्याने जाणाऱ्या गाड्यांची नासधूस
या काही हुल्लडबाज तरुणांनी तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे साहित्य ओढताड करत नुकसान केली. एका चारचाकी गाडीची नंबरप्लेट उखडून घेऊन गेले, गर्दी खूप असल्याने नागरिकांमधून त्यांनी पळ काढला.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

