Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर शहरात बुलेट मोटारसायकलींचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करत रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरासह वाळूज परिसरात काही तरुण सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात वाहन चालवत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेषतः दवाखान्यांसमोर, गर्दीच्या ठिकाणी आणि निवासी भागात अशा प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच लहान मुलांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर दि. १६ फेब्रुवारी रोजी वाहतूक शाखेकडून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.

या कारवाईदरम्यान वाळूज महानगर परिसरात एकूण ४० बुलेट वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ११ वाहनांचे सायलेन्सर नियमबाह्यरीत्या बदललेले आढळून आल्याने संबंधित वाहनचालकांवर दंड आकारण्यात आला. एकूण ४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सदर कारवाई वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश यादव, सहायक पोलीस निरीक्षक शंकर सिरसाठ तसेच अंमलदार आचेवाड, थोरात आणि साळवे यांच्या पथकाने केली.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

