
वाळूज महानगर (१३ ऑक्टोबर २०२५) — वडगाव कोल्हाटी येथील आनंद बुद्ध विहार येथे ६९व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त वर्षवास पवारणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची जोड लाभली.
सकाळच्या सत्रात पुज्य भिक्खु ज्ञानरक्षित थेरो, पुज्य भिक्खु एम. राहुल थेरो आणि भंत्ते महामोगल्यान यांच्या उपस्थितीत विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून त्रिशरण पंचशील देण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवीकुमार वसाटे, सुभाषजी मुदगडकर, प्रशांत देवतळे, नरेंद्र त्रिभुवन, रावसाहेब धोंडरे, एल. एल. गायकवाड, विकास रामटेके आणि यशवंत जोगदंडे उपस्थित होते.
यानंतर आनंद बुद्ध विहारात पूजनीय भिक्खू संघाचे स्वागत रॅलीद्वारे करण्यात आले. बुद्ध आणि भिमरूपाची पुष्प, धूप, दीपाने पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पूजनीय भिक्खू संघाने पंचशीलाचे महत्त्व सांगत आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण हेच सुखसमृद्ध जीवनाचे रहस्य असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात कवी-गायक प्रकाश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी वामनदादा कर्डक यांची गाणी तसेच स्वतःचे “लय बळ आलं दुबळ्या पोरांमध्ये” हे गाणे सादर करून वातावरण भारावून टाकले.
यानंतर कठीण चिवरदान कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी अष्टपरीस अर्थ दान देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्षवास उत्सव समिती २०२५ मधील ग्रंथवाचक गौतम पाईकराव, वंदना सावतकर, कौशल्याबाई निकम, कलाबाई साळवे, विजय गायकवाड, सतीश साळवे, जगन्नाथ निकम, आरती साळवे, द्वारकाबाई नरवडे, नामदेव केदारे, भगवान नरवडे, मगन निकम, अनुसया जोगदंडे, रेखा साळवे, अनिल जाधव, शारदा पाईकराव आदींनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक निकम, नामदेव सावते, शेषराव जोगदंडे, गौतम मोरे, सिद्धार्थ पैठणे, विजय प्रधान, विष्णू भावले, ईश्वर लोखंडे, ज्ञानेश्वर जाधव, व्ही.के. जाधव, उत्तम भडगळ, बाळू होर्शिळ, मुकुंद जोगदंडे, रवी लोंढे, शंकर खरात, कचरू दळवी, कृष्णा गायकवाड, रमेश दाभाडे, संतोष खंडागळे, सागर त्रिभुवन, लक्ष्मण परकारे, माणिक जोगदंडे, किरण चौतमल, सुनील साळवे, एस.पी. हिवराळे आदींनीही योगदान दिले.
महिलांमध्ये प्रज्ञा बनसोडे, संगीता निकम, रमाबाई दाभाडे, अर्चना निकम, विमल दळवी, शारदा निकम, गया साळवे, संगीता खरात, रंजना परकारे यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक शोभा पावला.
कार्यक्रमाची सांगता आशीर्वाद गाथेने आणि मंगलकामनांनी करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





