
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळुज : वाळुज पोलीस ठाणे हद्दीतील नारायण नगर, लांजी रोड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा अवघ्या चार तासांत करत वाळुज पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास प्रथमेश प्रभाकर गायकवाड (वय २०, रा. नारायण नगर) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार व स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा माग काढला आणि केवळ चार तासांत सकाळी आठ वाजेच्या सुमारास परभणी रेल्वे स्टेशनवरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक केलेले आरोपी असे रितेश सुनिल नरवडे (वय २१, रा. नारायण नगर, वाळुज, ता. गंगापूर) प्रदीप बाबासाहेब सुकासे (वय १९, रा. झेंडा मैदान, गंगापूर).
मयत प्रथमेश आणि आरोपी हे बालपणापासूनचे मित्र असून, प्रेमप्रकरणातून त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वैमनस्य निर्माण झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त मा.प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त मा.पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त मा. संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र सहाणे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, संदिप वाघ, नारायण बुट्टे, पोअं. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, पोह. संदिप धनेधर, शेख गफ्फार, श्रीकांत सपकाळ, स्नेहलकुमार गवळी व पोलीस मित्र अमन शेख, किशोर गाडेकर यांनी पार पाडली आहे.
– वाळुज पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेला तणाव आटोक्यात; स्थानिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक.
…
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


