Screenshot

https://www.facebook.com/share/v/17QXBSMefX/?mibextid=wwXIfr
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा │ संदीप लोखंडे
वाळुज महानगर (दि. १८ ऑक्टोबर) : वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. समर्थ मोबाईल शॉपी नावाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत काउंटरमधील सुमारे वीस हजार रुपये रोकड चोरून नेली. ही घटना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ रावसाहेब काटकर (रा. घाणेगाव) यांच्या मालकीची समर्थ मोबाईल शॉपी घाणेगाव येथे आहे. दिवाळीनिमित्त काटकर यांचा भाऊ शुभम यांनी १८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरापर्यंत दुकानाची साफसफाई करून ते बंद केले होते. मात्र, पहाटे तीन अनोळखी चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून दुकानाचा लॉक तोडला व शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी काउंटरमधील रोकड घेऊन पसार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
….
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


