
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज : प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना वाळूज परिसरात घडली आहे. लांजी रोडवर दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, प्रथमेश प्रभाकर गायकवाड (वय २२, रा. नारायणपूर) या तरुणावर त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने छातीत सपासफ वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या खुनामागे प्रेम प्रकरणातील वाद असल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर वाळूज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपी फरार असून पोलिसांनी त्याचा तीव्र शोध सुरू केला आहे.
या घटनेमुळे वाळूज परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास वाळूज पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





