
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : दिल्ली सायबर क्राईम विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका निवृत्त व्यक्तीकडून तब्बल ₹२,२५,२४,९००/- इतक्या मोठ्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तामिळनाडू राज्यातील तांबरम शहर पोलिसांच्या सायबर क्राईम विंगकडून गुन्हा नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता. यात संभाजीनगर गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक करण्यात अली आहे, अक्षय सुंदरराव वाघमोडे वय ३२ वर्ष रा साई श्रधा पार्क, वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तमिळनाडू राज्यात असलेल्या फिर्यादी यांना ९ ऑगस्ट २०२४ रोजी ‘रविशंकर’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला एसबीआय ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून ओळख दिली आणि फिर्यादीच्या नावावर क्रेडिट कार्ड जारी झाल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने दिल्ली सायबर पोलिस अधिकारी म्हणून संपर्क साधला आणि फिर्यादीचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतले असल्याचे सांगून धमकावले. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर पोलिस गणवेशातील लोक दाखवून फिर्यादीवर दबाव आणण्यात आला.
फसवणूक करणाऱ्यांनी ‘अटक आदेश’ व ‘सुप्रीम कोर्टाचा आदेश’ पाठवून फिर्यादीकडून विश्वास संपादन केला आणि १० ते १७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत RTGS, IMPS, UPI अशा विविध माध्यमांतून तब्बल १२ व्यवहारांद्वारे पैसे हस्तांतरित करून घेतले. समाजात बदनामी होईल या भीतीने फिर्यादीने कोणालाही न सांगता ही रक्कम पाठवली.
या प्रकरणी तांबरम शहर पोलिसांच्या सीसीबी सायबर क्राईम विंगमध्ये गुन्हा क्रमांक Cr.No.7/2025 नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी कलम ३४०(२) बीएनएस (बनावट दस्तऐवज वापरणे) आणि कलम ६६(डी) आयटी ॲक्ट २००० (संगणक संसाधनांचा वापर करून छद्मरूपणाद्वारे फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांकडून सर्व तांत्रिक पुरावे तपासले जात होते. यातील एका आरोपीला छत्रपती संभाजीनगरातील गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे व अंमलदार राहुल भंगाळे व तामिळनाडू पोलीस यांनी वाडगाव कोल्हाटी येथून अटक करण्यात अली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
- लाडक्या पत्नीचाच रौद्रावतार! फोन कॉलच्या वादातून नवऱ्यावर चाकू हल्ला
Share Total Views: 12 छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर - ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यश
Share Total Views: 29 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) बजाजनगर, - ESIC रुग्णाकडून अवैध पैसे उकळल्याचा आरोप; हॉस्पिटलने आरोप फेटाळले…
Share Total Views: 73 छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज - रूम भाड्याच्या वादातून तरुणाची आत्महत्या; रूम मालकासह तिघांविरोधात गुन्हा
Share Total Views: 110 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज - पोलिसांची भीती दाखवून सामान्य नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी? वाळूज एमआयडीसीतील ‘झिरो पोलिस’ पुन्हा सक्रिय असल्याची चर्चा
Share Total Views: 60 वाळूज महानगर | प्रतिनिधी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वतःला पोलिसांशी
