
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :
औद्योगिक नवकल्पना आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत बहुराष्ट्रीय कंपनी एंड्रेस+ हाऊसर इंडिया ऑटोमेशन इन्स्ट्रुमेंटेशन प्रा. लि. ने छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या युनिटच्या विस्ताराची घोषणा केली आहे. २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात कंपनीचे जर्मनी येथील संचालक (ऑपरेशन्स) श्री. जेन्स एल्झेनहायमर यांच्यासह ग्राहक, भागीदार, शासकीय प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

⸻
आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगदान
२००७ पासून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले हे उत्पादन केंद्र लेव्हल व प्रेशर मापन साधने तयार करून भारताबरोबरच दक्षिण-पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बाजारपेठांमध्ये पुरवठा करते.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत राहून हा विस्तार वाढत्या मागणीची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
या विस्तारामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण (VET), ई-लर्निंग आणि कौशल्यविकास उपक्रमांचा लाभ होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
⸻

अत्याधुनिक व पर्यावरणपूरक सुविधा
नवीन इमारतीत ७,५०० चौ.मी.हून अधिक जागा उपलब्ध होणार असून उत्पादन केंद्र, कार्यालये, सभागृहे व कॅफेटेरिया यांचा समावेश असेल.
या परिसरात पुढील सुविधा असणार आहेत :
• ऊर्जा कार्यक्षम स्मार्ट लाईटिंग, इन्सुलेटेड भिंती व छप्पर
• ५०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प
• पावसाचे पाणी संकलन व १००% पुनर्वापर
• वृक्षारोपण आणि हिरवाईयुक्त परिसर
• कामगारांच्या सुरक्षिततेवर विशेष भर
तसेच, ग्राहक अनुभव वाढविण्यासाठी इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले, डिजिटल वॉल व उत्पादन प्रदर्शन व्यवस्थाही उभारली जाणार आहे.
⸻
कौशल्यविकास व सामाजिक जबाबदारी
१९९४ पासून भारतात कार्यरत असलेल्या एंड्रेस+ हाऊसरने १९९९ मध्ये छत्रपती संभाजीनगर कॅम्पस सुरू केला. सध्या येथे सुमारे ८०० कर्मचारी थेट तर भारतातील इतर विभागांत ४५० कर्मचारी अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत.
वेल्डिंग प्रशिक्षण, ई-लर्निंग व विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण यांसारख्या उपक्रमांतून स्थानिक युवकांचा विकास साधला जात आहे.
⸻
मान्यवरांची उपस्थिती
भूमिपूजन सोहळ्यात कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग) संदीप तुळापूरकर, आशिष मिश्रा, चारुदत्त, कविता राज, राजेंद्र कोलते, सनत कुमार साहू, डॉ. जेन्स एल्झेनहायमर, एक्सेल फिकस, स्टीफन ख्रिश्चन-कोहलर, नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजू शिंदे, श्रीराम संपतश्री, डी. गंगाधर राव, योगेश नारगोळकर, निलेश कावणकर, दीपक सुर्थी, वामन पाटील, अमित पांडे, संतोष कराळे, प्रविण गजभिये, हितेश बधे, प्रशांत उपरे, प्रसाद, केदार नितीन वाघमारे, पंकज पुराणिक भाटे, जयदीप राजे, संजय लाहोटी यांचीही विशेष उपस्थिती होती.
॰॰॰॰
-
१७ वर्षाच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती; वडगाव कोल्हाटी येथील घटना…
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
सिडको-वाळूज पाणी प्रश्नावर आंदोलन तीव्र; दत्तात्रय वर्पे आजपासून अमरण उपोषणावर
Share Total Views: 13 छत्रपती संभाजीनगर : सिडको व वाळूज महानगर परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर पंचायत
-
पंढरपूर गावातील पाणीटंचाईवर उपाय; पंचायत समितीकडून तीन टँकर सुरू
Share Total Views: 44 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – पंढरपूर : गावामध्ये



