February 5, 2026
1001539890

पुरस्थिती आणि संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेऊन निर्णय

छत्रपती संभाजीनगर – हवामान विभागाने वर्तविलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणि आज निर्माण झालेल्या पूरस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना उद्या, दिनांक २९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (IAS) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची तसेच शालेय कर्मचारी यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा आदेश महापालिका क्षेत्राला लागू राहणार नाही.

➡️ प्रशासनाने नागरिकांना आणि पालकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!