
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करून तब्बल पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे.
अटक झालेल्या आरोपीचे नाव अभय विनोद जाधव (वय २५, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे आहे. दि. २ सप्टेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाच्या दरम्यान संशयित अभय जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने वाळूज एमआयडीसी हद्दीतील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) श्री. पंकज अतुलकर, व मा. सहा. पोलीस आयुक्त (छावणी विभाग) श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर गाडे यांच्या पथकाने केली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पथरकर श्री. दिनेश बन तसेच अंमलदार बाबासाहेब काकडे, जालींदर रंधे, सुरेश कचे, विलास वाघ, हनुमान ठोके, सुरेश भिसे, वैभव गायकवाड, रोहित चिंधाळे, नितीन इनामे, समाधान पाटील, लखन गुसिंगे, संतोष बमनात, संदिप तागड व शिवनारायण नागरे यांचा सक्रिय सहभाग होता.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





