
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : बजाजनगर येथील अयोध्या नगरमध्ये किरकोळ कारणावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना दि ८ रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घडली असून, मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे.
रोहन आदिक (रा. अयोध्या नगर, बजाजनगर) असे आरोपीचे नाव असून, गाडी लावण्याच्या कारणावरून फिर्यादी महिला व आरोपी यांच्यात वाद झाला. संतापलेल्या आरोपीने आपल्या मित्रांना बोलावून थेट महिलेच्या घरात घुसून मारहाण केल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

मारहाणीदरम्यान आईला मारहाण होत असल्याचे बघून लेकीने थेट आरोपी तरुणांना भिडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी तिलाही धक्काबुक्की करून जुमानले नाही. या मारहाणीमुळे आईसह लेकीलाही धक्के बसले असून, जखमी महिला सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
आरोपीची दादागिरी कायम : “पोलीस आमचे ओळखीचे आहेत” –
या प्रकरणी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली असता, आरोपीने धमकी दिली की “पोलीस आमचे ओळखीचे आहेत, काही होणार नाही.” धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपीला मोकाट सोडल्याची फिर्यादीची तक्रार आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही आरोपींनी पुन्हा शिवीगाळ व धमकी दिली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


