
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) –
MIDC वाळूज पोलीसांनी तलवार व चाकू सारखी घातक हत्यारे बाळगून विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही कारवाई दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 7.20 वाजता करण्यात आली.
पोह/जालिंदर रंधे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक साठे चौक – शनिमंदिर रस्त्यावरील वडगाव को. येथे पोहोचले. तिथे काळ्या रंगाच्या मोटारसायकल (क्र. MH-20-GS-3858) वर दोन संशयित थांबलेले दिसले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले असता त्यांची नावे मयुर दिलीप मोटे (19, बजाजनगर) व देवांग आप्पासाहेब बेंद्रे (19, बजाजनगर) अशी समोर आली.
त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलला अडकविलेल्या खाकी रंगाच्या बॉक्समधून एक धारदार स्टीलची तलवार आणि तीन धारदार चाकू मिळाले. पोलिसांनी वापराचा परवाना विचारला असता तो नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकूण ₹4,000 किमतीची घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पो.स्टे. MIDC वाळूज येथे शस्त्र अधिनियम कलम 4/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त प्रविण पवार, मा. उप आयुक्त पंकज अतुलकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व सपोनि मनोज शिंदे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
सदरची कामगिरी ही मा.श्री. प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्र.-1, श्री. पंकज अतुलकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय सानप, श्री. रामेश्वर गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सपोनि/श्री. मनोज शिंदे, यांचे मार्गदर्शना खाली पोह/बाळासाहेब आंधळे, पोह/जालींदर रंधे पोह/बाबासाहेब काकडे, पोह/कचे, पोअं/सुरेश भिसे, पोअं/ लखन घुसिंगे, पोअं/ संतोष बमनात, पोअं/ समाधान पाटील, पोअं/नितीन इनामे, पोअं/संदीप तागड, पोअं/शिवनारायण नागरे, पोअं/हनुमान ठोके यांनी केलेली आहे
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


