
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : जोगेश्वरी गावाजवळील तलावात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून हा प्रकार अपघात आहे की खून याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव ज्ञानेश्वर मनोहर जाधव (वय 28, रा. श्रद्धा कॉलनी, वाळुज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ज्ञानेश्वर हा जोगेश्वरी गावाजवळील तलावाच्या पाण्यात बुडाला. त्यास नागरिकांनी घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी आणले.
रुग्णालयातील अपघात विभागात दाखल केल्यानंतर तपासणीदरम्यान डॉक्टरांनी ज्ञानेश्वरला संध्याकाळी 5.15 वाजता मृत घोषित केले.
या घटनेची माहिती एस.आर. खिल्लारी, बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या घाटी मेडिकल पोलीस चौकीतून पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास अंमलदार उदे हे करीत आहे.
या मृत्यूमागे तलावात बुडून अपघाती मृत्यू झाला की यामागे अन्य काही कारण असून खून तर नाही ना, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती समजते.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





