
वाळूज, दि. 21 ऑगस्ट (प्रतिनिधी) –
छत्रपती संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रात वाढत्या वाहतूक कोंडी, चोरी, अपघात आणि कामगार सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी मसिआच्या वाळूज येथील कार्यालयात काल (दि. 20 ऑगस्ट) “संवाद उद्योजकांशी” या शीर्षकाखाली विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीला एमआयडीसी पोलिस स्टेशन वाळूजचे माननीय पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर गाढे पाटील, मसिआचे अध्यक्ष श्री. अर्जुन गायकवाड, माजी अध्यक्ष श्री. अनिल पाटील, श्री. चेतन राऊत, उपाध्यक्ष श्री. राहुल मोगले व श्री. मनिष अग्रवाल, सचिव श्री. सचिन गायके, कोषाध्यक्ष श्री. सर्जेराव साळुंके, प्रसिद्धी प्रमुख श्री. राजेंद्र चौधरी यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. अर्जुन गायकवाड यांनी औद्योगिक क्षेत्र हे केवळ उत्पादनाचे केंद्र नसून हजारो कामगार व उद्योजकांच्या उपजीविकेचे आधारस्थान असल्याचे नमूद केले. चोरी, लुटमारी, वाहतूक कोंडी, रात्रपाळीतील महिलांच्या सुरक्षेसारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर गाढे पाटील यांनी उद्योजकांना आश्वासन दिले की, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे. “कुठलीही अनुचित घटना घडल्यास घाबरून न जाता त्वरित 112 या क्रमांकावर संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, उद्योग परिसरात CCTV कॅमेरे बसवणे, तसेच कामगारांची नियुक्ती करताना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे यासंदर्भात मार्गदर्शनही केले.
बैठकीत उद्योजकांनी आपापल्या समस्या मांडल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चाही झाली. उपाध्यक्ष श्री. राहुल मोगले यांनी बैठकीच्या उद्देशाचे स्पष्टीकरण दिले, तर सचिव श्री. सचिन गायके यांनी प्रस्ताविक केले आणि आभार प्रदर्शनही मोगले यांनीच केले.
या चर्चासत्रातून निश्चितच औद्योगिक क्षेत्राला सुरक्षित वातावरण लाभेल आणि उद्योजकांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.
॰॰॰॰
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


