
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
गंगापूर : छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर महामार्गावरील ईसरवाडी येथे १६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक व टेम्पोच्या धडकेत टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत दोन तरुण टेम्पोमध्ये अडकून पडले होते.

दरम्यान, त्याच मार्गाने पुण्याकडे निघालेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा ताफा जात असताना त्यांनी अपघात पाहून तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बाहेर काढून अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिली.

या अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे सुहास कांबळे व पवन पठारे अशी आहेत. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
👉 अपघातग्रस्तांच्या जीव वाचविण्यासाठी योग्य वेळी धावून आलेल्या अंबादास दानवे यांच्या तात्पर्यपूर्ण मदतीचे कौतुक होत आहे.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





