
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही धडक कारवाई दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता तिसगाव मिटमिटा रोडवरील तिसगाव वस्तीजवळ करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित सुदाम लहाने (वय २१, रा. मुकुंदवाडी) असे आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी पथकासह सापळा रचत ही यशस्वी कारवाई केली.
अमित लहाने हा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, प्रशांत गिते, पोलीस उपनिरीक्षक बन, अंमलदार बाबासाहेब काकडे, विलास वाघ, विशाल पाटील, जालिंधर रंधे, लखन घुसिंगे, समाधान पाटील, राजाभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, शिव नगरे व नितीन इमाने यांचा सहभाग होता.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून कट्टा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





