
वडगाव कोल्हाटी / वळदगाव – न्यूज मराठवाडा प्रतिनिधी
वडगाव कोल्हाटी व वळदगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांना २०११ पूर्वीच्या जमिनींचे मालकी हक्क देण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. आज दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात आली. यावेळी १७ जुलै २०२५ रोजी महसूल विभागाने काढलेल्या शासन निर्णयाच्या (जीआर) पत्रकाचा व २९ जुलै २०२५ रोजी घोषित “महसुली सप्ताह” यांचा संदर्भ घेण्यात आला.
विशेष म्हणजे, २ ऑगस्ट रोजी वडगाव कोल्हाटी येथे व ४ ऑगस्ट रोजी वळदगाव येथे झालेल्या ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेल्या ठरावांच्या निवेदनाच्या प्रती निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश होता:
सावित्रीबाई फुलेनगर – गट नंबर 20 शिवाजीनगर – गट नंबर 4 पंढरपूर – गट नंबर 12/13 वळदगाव गायरान – गट नंबर 175
ग्रामसभांमध्ये संबंधित मालकी हक्क प्रक्रियेस गती देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
या ग्रामसभांना व शिष्टमंडळात सहभागी होते:
सरपंच सुनील भाऊ काळे, ज्येष्ठ नेते के. व्ही. दादा गायकवाड, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, माजी सरपंच अंजनभाऊ साळवे, समिती सदस्य रमेश दाभाडे, प्रकाश निकम, नरेंद्र त्रिभुवन आणि ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, सचिन प्रधान, सचिन मोरे, योगेश साळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ.
यावेळी ग्रामस्थांनी एकमुखाने शासन दरबारी मालकी हक्काची मागणी लवकर मान्य करावी अशी भूमिका मांडली. महसूल विभागाच्या पुढील कार्यवाहीसाठी हे निवेदन महत्त्वाचे ठरणार आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 6 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


