November 28, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर

आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात यंदा अभूतपूर्व गर्दी उसळली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी मनोभावे दर्शन घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा सुमारे १० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

Screenshot

पहाटेपासूनच पारंपरिक वेशभूषेतील भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत मंदिर परिसर गजबजून गेला होता. महिला, वृद्ध, तरुण मंडळींसह अनेक दिंड्या दाखल झाल्याने परिसर भक्तिमय झाला होता.

भाविकांसाठी नाष्टा, फराळ, चहा, पाण्याची तसेच आरोग्य सुविधा, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि पोलिस बंदोबस्ताची योग्य व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.

दरम्यान अशा पवित्र आणि भक्तिमय वातावरणात काही अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनुसार, सुमारे ३५ महिलांचे गळ्यातील दागिने चोरीला गेले असून, ही संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Screenshot

पोलिसांनी भाविकांना सतत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चोरीप्रकरणी CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कर्तव्य पूर्तीच्या जोडीने भक्तीची झलक – पोलीसही विठ्ठलनामात दंग

विठ्ठल चरणी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलिसांनाही भक्तीच्या लाटेने स्पर्श केला. काही पोलिस कर्मचारी टाळ- मृदंगाच्या तालावर भाविकांबरोबर फुगड्या खेळताना आणि विठ्ठलनामात दंग होताना दिसले. कर्तव्य आणि भक्ती यांचा सुरेख संगम यानिमित्ताने पहायला मिळाला.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!